हाय टेक पाईप्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. हायटेक स्टील पाईप्स आणि त्याच्याशी संबंधित उत्पादने या कंपनीकडून तयार केली जातात.
या कंपनीची उत्पादने पायाभूत सुविधा, बांधकाम, ऑटोमोबाईल्स, ऊर्जा, कृषी, संरक्षण, अभियांत्रिकी आणि दूरसंचार यासह अनेक क्षेत्रांमध्ये वापरली जातात. 2016 पासून ही कंपनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, NSE चे देखील सूचीबद्ध सदस्य आहोत.
1986 पासून ही कंपनी कार्यरत असून स्टील उत्पादनांची एक आघाडीची भारतीय उत्पादक आहे. या कंपनीच्या उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये फ्लॅट स्टील, ट्यूबलर स्टील उत्पादने, अभियांत्रिकी स्टील उत्पादने आणि इतर अनेक गॅल्वनाइज्ड स्टील उत्पादनांचा समावेश आहे.
दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये निव्वळ विक्री 440.02 कोटी झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.85% वाढली आहे. डिसेंबर 2020 मध्ये 415.70 कोटी होती.