बांधकाम व्यवसायासाठी साहित्य पुरवणारी HIL लिमिटेड (Hyderabad Industries Limited)कंपनी ही CK बिर्ला ग्रुपची महत्त्वाची कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९४६ साली झाली होती. गेल्या ७५ वर्षांपासून ही कंपनी भारतातील अग्रगण्य कंपनी राहिली आहे.
HIL लिमिटेडचे चारमिनार, बिर्ला एरोकॉन, चारमिनार fortune, बिर्ला HIL आणि Parador असे पाच महत्वाचे ब्रँड आहेत. भारतातील जवळपास २१ राज्यात या कंपनीचे प्लांट आहेत तर जर्मन आणि ऑस्ट्रेलिया येथेही प्लांट आहेत. पर्यावरणाचा आदर करत या कंपनीकडून बांधकामासाठी लागणारे साहित्य निर्मिती केली जाते. भारतासह जगभरातील ८० पेक्षा जास्त देशात या कंपनीचा विस्तार आहे.
गेल्या काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स घसरत आहेत. बाजारातील मंदी लक्षात घेता या क्षेत्रातही पडझड झाल्याने या कंपनीच्या शेअरवरही परिणाम झाला आहे. मात्र येत्या काळात या कंपनीचे शेअर्स वधारण्याची शक्यता असल्याचे म्हंटले जात आहे.