अनेक फार्मा कंपन्यांनी जीएसटी भरलाच नाही, डीजीजीआयकडून कारवाई

वस्तू आणि सेवा कर सुरू झाल्यापासून एकदाही कर न भरलेल्या अनेक फार्मा कंपन्यांवर डीजीजीआयने कारवाई केली आहे. कलम २५ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी तपास शाखा म्हणजे डीजीजीआय अशा कंपन्यांवर नजर ठेवून आहे.

फार्मा क्षेत्रातील कंपन्यांमधील कर आकारणीबाबत डीजीजीआयने सर्वेक्षण केले, ज्यामध्ये जीएसटी लागू झाल्यापासून या कंपन्यांनी कर भरला नसल्याचे समोर आले. कलम 25 चा चुकीचा अर्थ लावत फार्मा कंपन्यांनी हा कर भरला नाही. डॉ. रेड्डीज, ग्लेनमार्क, अरबिंदो फार्मा, मायलॉन, सिप्ला यासारख्या फार्मा कंपन्यांनी कर भरला नसल्याचे समोर आले होते.

कंपन्यांनी कर थकवल्याबाबत डीजीजीआयने जाणीव करून दिल्यानंतर कंपन्यांनी आपली चूक मान्य केली आहे. त्यानंतर त्यांनी जीएसटीची रक्कमही भरली. मात्र, जीएसटी विभाग केवळ कलम 25 तपासत नाही, तर इतर अनेक गोष्टींवरही लक्ष ठेवून आहे. काही कंपन्यांनी त्यांची औषधे परदेशात पाठवली, जी US FDA ने नाकारली. परंतु कंपन्यांनी देशात त्यावर आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडिट) घेतली, जी परत केली गेली नाही.

अनेक फार्मा कंपन्या जीएसटीच्या रडारवर येणार आहेत. जीएसटी आता केवळ त्यांचे कलम 25 नाही तर इतर व्यवहारही पाहणार आहे.

Scroll to Top