तीन रुपयांच्या शेअरची किंमत सहा वर्षांत झाली ५९३ रुपये, गुंतवणूकदारांना चांगला परतावा

सध्या शेअर बाजार प्रचंड अस्थिर आहे. त्यामुळे पडलेले शेअर खरेदी करण्याकडे गुंतवणूकदरांचा कल आहे. मात्र, कोणतेही शेअर घेऊन गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे येत्या काळात चांगला परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार आहे. अशा मल्टिबॅगर स्टॉकची माहिती होणं फार गरजेचं आहे. राईस मिलिंग व्यवसायाशी संबंधित असलेली जीआरएम ओव्हरसिस कंपनीने आपल्या गुंतवणकूदारांना चांगला परतावा दिला आहे.

सहा वर्षांपूर्वी जीआरएम ओव्हरसिसच्या शेअरची किंमत केवळ ३ रुपये होती. ती आता २०२२ मध्ये तब्बल ५९३ रुपये झाली आहे. यादरम्यान स्टॉकमध्ये सुमारे २०० पटींनी वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र सध्या बाजार अस्थिर असल्याने गेल्या एक महिन्यापासून हा शेअर सुमारे १७ टक्क्यांनी घटला. परंतु तरीही हा शेअर सुमारे ७७० टक्क्यांनी वाढला आहे.

सहा वर्षांपूर्वी या कंपनीत जर कोणी एक लाख रुपयांची गुतंवणूक केली असेल तर्यांना आज २ कोटी रुपये मिळाले असते. कारण गेल्या ६ वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल १९ हजार ९०० पटींनी वाढ झाली आहे.

वर्षभरापूर्वी या कंपनीत जर गुंतवणूकदारांने १ लाख रुपये गुंतवले असते तर त्याची आज किंमत ८.७० लाख एवढी झाली असती. तर, सहा महिन्यात या कंपनीने तीन लाख रुपयांपर्यंतचा परतावा दिला असता. जानेवारी २०२२ मध्ये ५२ आठवड्यांचा उच्चांक ९३५.४० रुपये होता. तर या स्टॉकचा वर्षभरातील निच्चांक ६६.८० टक्के होता.

Scroll to Top