Gold Price Hike Reasons | अक्षय तृतीयेला (Akshaya Tritiya) काही दिवस असताना, भारतातील सोन्याच्या (Gold Price) किमतींनी इतिहास रचला आहे.. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,00,000 रुपयां वर पोहोचला असून, हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. ऑगस्ट महिन्याच्या डिलिव्हरीसाठी हा दर सत्रादरम्यान रुपये 2,048 म्हणजेच 2.1% नी वाढला.
सोन्याच्या या वाढत्या किंमतीमुळे बाजारात उत्सुकता निर्माण झाली आहे. याच दरम्यान अभिनेता शक्ती कपूर यांचा एक जुना विनोदी चित्रपटातील सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात त्यांनी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. या क्लिपमुळे अनेक गुंतवणूकदार आणि सोशल मीडिया युजर्स त्यांना ‘आर्थिक भविष्यवेत्ता’ म्हणत चेष्टा-मस्करी करत आहेत. याचे मीम्स देखील सोशल मीडियावर शेअर केले जात आहे.
सोन्याच्या वाढीमागची कारणं काय? (Five key reasons behind the rally in gold prices)
भू-राजकीय तणाव (Geopolitical Tensions) – अमेरिका-चीन व्यापार तणाव, मध्यपूर्वेतील अस्थिरता आणि युरोपातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीसारखा दृष्टिकोन स्वीकारला आहे.
कमजोर डॉलर (Weak US Dollar) – अमेरिकन डॉलर निर्देशांक 100 च्या खाली घसरल्याने जागतिक गुंतवणूकदारांसाठी सोने अधिक आकर्षक बनले आहे.
अमेरिकेतील मंदीची भीती (Fear of Recession in US) – गोल्डमन सॅक्सने 2025 मध्ये मंदीची शक्यता 45% पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.
गोल्ड ईटीएफमध्ये वाढ (ETF inflows) – फेब्रुवारी 2025 मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये ₹1,979.84 कोटींची गुंतवणूक झाली, जी मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. गुंतवणूकदार भौतिक सोन्यापेक्षा तरलतेसह सुरक्षित पर्यायाकडे वळले आहेत.
मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी (Gold Reserves) – वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, 2024 मध्ये जागतिक मध्यवर्ती बँकांनी 1,000 टनांपेक्षा जास्त सोने खरेदी केलं, जे डॉलरवरील अवलंबन कमी करण्यासाठी धोरणात्मक पावलं मानलं जात आहे.