लॉकडाऊनमुळे अनेकांचे LIC चे हप्ते थकले. त्यामुळे LIC धारकांना दिलासा देता यावा म्हणून EPFO ने नवी योजना सुरू केली आहे. त्यानुसार EPFO सदस्य गरज भासेल तेव्हा त्यांच्या पीएफ खात्यातून LIC चा हप्ता भरू शकतात.
महत्वाचे म्हणजे फक्त LICचाच विमा तुम्ही पीएफ खात्यातून भरू शकता, अन्य कोणत्याही कंपनीचा विमा तुम्ही पीएफ खात्यातून भरू शकत नाही. या योजनेचा लाभ उठवण्यासाठी पीएफ खातेधारकला EPFO कडे फॉर्म १४ भरावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला EPFO च्या संकेत स्थळावर मिळेल. हा फॉर्म सबमिट केल्यावरच तुम्ही LIC चा विमा पीएफ खात्यातून भरू शकता. फॉर्म १४ पीएफ खात्यात सबमिट केल्यामुळे तुमची LIC पॉलिसी EPFO खात्याला लिंक केली जाईल. तेव्हा PF खात्यातून LIC पॉलिसीचा प्रीमियम कापला जाईल.
…पण एक अट आहे
भविष्य निर्वाह निधी आपल्या निवृत्ती नंतर उपयोगाला येते. त्यामुळे प्रत्येकवेळी या निधीचा वापर करून निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन बिघडवू नका. तुम्हाला जर पीएफ खात्यातून LIC चा विमा भरायचा असेल तर पीएफ खात्यात किमान २ वर्षांच्या प्रीमियम इतकी टक्के असणे गरजेचे आहे.