आयशर मोटर्स लिमिटेड कंपनी ही भारतातील बहुराष्ट्रीय कंपनी असून या कंपनीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. मोटर सायकल आणि कमर्शिअल गाड्या बनवण्याचे काम या कंपनीकडे केले जाते. रॉयल एनफिल्ड ही या कंपनीची मुख्य कंपनी आहे.
आयशर मोटर्स ही कमर्शिअल गाड्या बनवणारी भारतातील कंपनी आहे. Goodearth नावाची कंपनी १९४८ साली स्थापन झाली होती. तेव्हा या कंपनीकडून आयात केलेले ट्रॅक्टर वितरीत केले जायचे. त्यानंतर १९५९ साली आयशर ट्रॅक्टर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना झाली. जर्मन ट्रॅक्टर कंपनी आईचर ट्रॅक्टर कंपनीसोबत या कंपनीने भागीदारी केली. मात्र १९६५ नंतर आयचेर ही कंपनी पूर्णतः भारतीय भागीदरांची झाली.
बस, ट्रक, मोटरसायकल, ऑटोमोटिव गिअरचे डिझाईन, डेव्हलपमेंट, निर्मिती, जागतिक आणि स्थानिक मार्केटिंग आदी विविध काम या कंपनीकडून केले जाते.
गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्स मध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत. मात्र या कंपनीचे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातोय. कारण येत्या काळात या कंपनीकडून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.