आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे याकरता सरकारकडृून नवी योजना सुरू करण्यात आली आहे. डॉ आंबेडकर फाउंडेशन योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना नवविवाहित जोडप्यांना अडीच लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जात आहे. यामुळे आर्थिक स्थिती बदलण्यास मदत होणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय किमान १८ आणि मुलाचे वय किमान २१ वर्षे असावी लागतात. तसेच, या जोडप्यापैकी एकजण दलित समाजातील आणि दुसरा दलित समाजाबाहेर असावा असा नियम आहे. तसेच, या जोडप्याने हिंदू विवाह कायदा १९५५ अंतर्गत विवाहाची नोंदणी करणे गरजेचे आहे. दोघेही दलित समाजातील असतील किंवा दोघेही दलित समाजातील नसतील तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
पहिल्यांदा विवाह करणाऱ्यांना जोडप्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नाही. लग्नाची नोंदणी केल्यानंतर, नवविवाहित जोडप्याला तुमचे विवाह प्रमाणपत्र सादर करावे लागतील. यानंतर कपल डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनसाठी अर्ज करा. लक्षात ठेवा की या योजनेचा लाभ लग्नानंतर एक वर्षाच्या आतच घेता येईल. एक वर्षानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
 
								 
								 
								 
								 
								 
				 
								 
								 
								 
								 
								 
								








