१९७८ साली स्थापन झालेली Biocon कंपनी ही औषध निर्मिती क्षेत्रातील महत्वाची कंपनी आहे. मधुमेह, कर्करोग आदी रोगांवरील औषधांची निर्मिती या कंपनीकडून केली जाते. जगभरातील १२० देशात या कंपनीची औषधे पोचली आहेत.
३१ डिसेंबर २०२१ मध्ये सादर झालेल्या तिमाहीत या कंपनीने २२२२.५० कोटींचा नफा कामवला होता. सप्टेंबरच्या तिमाहीत हाच नफा १९४५.३० कोटी होता. म्हणजेच शेवटच्या तिमाहीत या कंपनीने १४.२५ टक्के अधिक नफा कमावला आहे. तर गेल्या वर्षी या कंपनीचा नफा १८७८.९० कोटी होता. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या कंपनीने १८.२९ टक्के नफा कमावला आहे. तर या कंपनीने २६६.८० कोटी मुळ नफा कमावला आहे.
सध्या या कंपनीचे शेअर्स अस्थिर असले तरी या कंपनीतील गुंतवणूक फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. येत्या काळात या कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढणार असल्याचेही म्हंटले जात आहे. अत्यंत महत्वाची औषधे या कंपनीकडून निर्माण केली जातात त्यामुळे ही कंपनी नेहमी नफ्यात असते. याचा परिणाम शेअर मार्केटवर होत असतो.