Ather Energy IPO: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीत गुंतवणुकीची संधी; पाहा डिटेल्स

Ather Energy IPO

Ather Energy IPO | एथर एनर्जी लिमिटेड (Ather Energy Limited) या इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या कंपनीने भारतीय बाजारात (Indian primary market) आपला पहिला मोठा IPO आणला आहे.

BSE च्या माहितीप्रमाणे हा IPO 30 एप्रिल 2025 पर्यंत खुला राहणार आहे. कंपनीने एका शेअरची किंमत ₹304 ते ₹321 अशी ठेवली आहे.

एथर एनर्जीने अँकर गुंतवणूकदारांकडून 1,340 कोटी रुपये जमा केले आहेत. IPO सुरु होण्यापूर्वीच एथरचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये (grey market) व्यवहारात आहेत. IPO चे ग्रे मार्केट प्रीमियम 3 रुपये आहे.

IPO पहिल्या दिवशी किती भरला?

पहिल्या दिवशी एथर एनर्जीचा IPO एकूण 0.15 पट सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांनी 0.60 पट, मोठ्या गुंतवणूकदारांनी (NII) 0.15 पट आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव भाग 1.67 पट भरला आहे.

एथर एनर्जी IPO विषयी महत्त्वाची माहिती

  • GMP (Grey Market Premium): बाजार निरीक्षकांच्या मते, कंपनीचे शेअर्स सध्या ₹3 च्या प्रीमियमवर व्यवहारात आहेत.
  • किंमत बँड: एथर एनर्जीने IPO साठी 304 ते 321 रुपयांदरम्यान किंमत निश्चित केली आहे.
  • इश्यूच्या तारखा: IPO 30 एप्रिल 2025 रोजी बंद होईल. म्हणजेच गुंतवणूकदार आयपीओसाठी 30 एप्रिलपर्यंत बोली लावू शकतील.
  • अलॉटमेंट तारीख: शेअर्सचे वाटप संभाव्यतः 1 मे 2025 रोजी होणार आहे. मात्र, त्या दिवशी सुट्टी असल्याने अलॉटमेंट 2 मे 2025 पर्यंत पुढे ढकलले जाऊ शकते.
  • इश्यू आकार: एकूण 2,981.06 कोटी रुपयांचा इश्यू असून त्यात 354.76 कोटी रुपयांचा भाग OFS (Offer for Sale) द्वारे उभारला जाणार आहे.
  • लॉट साइज: एका लॉटमध्ये 46 शेअर्स असतील.
  • जिस्ट्रार: लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना रजिस्ट्रार म्हणून नियुक्त केले आहे.
  • लीड मॅनेजर्स: ॲक्सिस कॅपिटल, एचएसबीसी सिक्युरिटीज, जेएम फायनान्शियल आणि नोमुरा फायनान्शियल ॲडव्हायझर्स या कंपन्या लीड मॅनेजर्स आहेत.
  • लिस्टिंग तारीख: IPO 6 मे 2025 रोजी शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता आहे.