गेल्या काही दिवसांत पेटीएमच्या शेअरमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांचे करोडेंचे नुकसान झाले आहे. मात्र, येत्या काळात हा शेअर जास्त वधारणार असल्याचे भारत पेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर यांनी म्हटलंय. तसेच, हा शेअर विकत घेण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे. त्यांनी ट्विटरद्वारे या शेअरमागचं गणित मांडलं.
ट्विटरद्वारे अशनीर ग्रोव्हर म्हणाले की, \”पेटीएमचा शेअर खरेदी करण्यासाठी ही योग्य संधी आहे. याचं व्हॅल्यूएशन ७ अब्ज डॉलर्स आहे. स्वत: उभारलेलं फंड ४.६ अब्ज डॉलर्स आहे. कॅश इन हँड १.५ अब्ज डॉलर्स असलं पाहिजे. तर ६०० च्या बाजार मूल्यावर, गेल्या १० वर्षांमध्ये ३.१ अब्ज डॉलर्स खर्च केल्यानंतर क्रिएट झालेली व्हॅल्यू ५.५ अब्ज डॉलर्स आहे. हे बँक FD रेटपेक्षा कमी आहे BUY!!,\”
पेटीएमने आयपीओ आणला तेव्हा या कंपनीने सपाटून मार खालला. तेव्हापासून या कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड उलथापालथ होत आहे. त्यामुळे अशनीर ग्रोव्हर यांच्या या सल्ल्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा हा सल्ला माणन्यास गुंतवणूकदार तयार नाहीत. पेटीएमचं आयपीओ प्राईज २१५० रुपये ठेवण्यात आली होती. परंतु आता याचे शेअर ७० टक्क्यांपेक्षा अधिक घसरले आहेत, हे मागील कारण असण्याची शक्यता आहे.
गुरूवारीदेखील Paytm च्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कंपनीचे शेअर ६.२८ टक्क्यांनी घसरून ५९४.२५ रुपयांवर बंद झाले. गेल्या पाच दिवसांत या शेअर्सच्या किंमतीत २३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर २०२२ च्या सुरूवातीपासून पेटीएमचे शेअर ५५.६५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.