Home / अर्थ मित्र / सहा कंपन्या अदानी पॉवरमध्ये विलीन होणार, संचालक मंडळाची मंजुरी

सहा कंपन्या अदानी पॉवरमध्ये विलीन होणार, संचालक मंडळाची मंजुरी

अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड, अदानी पॉवर राजस्थान लिमिटेड, अदानी पॉवर (मुंद्रा) लिमिटेड, उडुपी पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, रायपूर एनर्जी लिमिटेड आणि...

अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड, अदानी पॉवर राजस्थान लिमिटेड, अदानी पॉवर (मुंद्रा) लिमिटेड, उडुपी पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, रायपूर एनर्जी लिमिटेड आणि रायगड एनर्जी जनरेशन लिमिटेड या अदानी समूहाच्या उपकंपन्या अदानी पॉवरमध्ये विलीन होणार आहेत. या विलिनीकरणाला संचालक मंडळांनी मंजुरी दिली आहे. २२ मार्च रोजी झालेल्या बैठकीत ही मंजुरी मिळाली असल्याची माहिती बीएसई फायलिंगमध्ये देण्यात आली.

या विलीनीकरणामुळे या सहा कंपन्यांची संपूर्ण संपत्ती आणि दायित्वे अदानी पॉवरकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. दरम्यान, या विलिनीकरणामुळे कंपनीच्या इक्विटी शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपनीद्वारे कोणतेही शेअर्स जारी करण्यात येणार नाहीत. अदानी पॉवरच्या सहा शाखाही वीज निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात कार्यरत आहेत.

विलिनीकरणाचे हे वृत्त समजताच अदानी पॉवरच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच कंपनीच्या शेअरनं ८.५७ टक्क्यांची उसळी घेतली आणि १३४.३५ रुपयांवर पोहोचला. परंतु बाजार बंद होताना त्यात थोडी घसरण झाली असून तो १३०.०५ रुपयांवर बंद झाला.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या