या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट मध्ये मोठी पडझड झाली. जागतिक बाजारात सुरू असलेल्या पडझडीचे आशियाई शेअर बाजारात फटका बसत आहे. मात्र तरीही अनेक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरत आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्राईटकॉम समूहाचे शेअर्स. या शेअरने वर्षभरात २ हजार ३२० टक्के नफा दिला आहे.
१2 फेब्रुवारी 2021 रोजी 6.17 रुपयांवर बंद झालेला पेनी स्टॉक आज बीएसईवर 150.10 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. जर गुंतवणूकदारांनी ब्राईटकॉम ग्रुपच्या शेअर्समध्ये वर्षभरापूर्वी गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम आज 24.23 लाख रुपये झाली असती. त्या तुलनेत सेन्सेक्स या कालावधीत 10.36 टक्क्यांनी वाढला आहे. बीएसईवर मिडकॅप शेअरने आज इंट्रा डे उच्चांकी रु. 150.10 गाठला. बीएसईवर आधीच्या 157.70 रुपयांच्या बंदच्या तुलनेत हा शेअर 4.98% च्या घसरणीसह 149.85 रुपयांवर उघडला.
५ मे २०२१ रोजी 5.82 रुपये होता तर 24 डिसेंबर 2021 रोजी हा आकडा 204.80वर पोचला.