शेअर बाजारात सहाव्या महिन्यातही परदेशी विक्री सुरू

भारतीय शेअर बाजारातून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून (FPIs) गुंतवणूक काढून घेण्याची प्रक्रिया सलग सहाव्या महिन्यात सुरू आहे. मार्चमध्ये आतापर्यंत FPIsने भारतीय बाजारातून 45,608 कोटी रुपये काढले आहेत.

FPIs ने 2 ते 11 मार्च दरम्यान इक्विटीमधून 41,168 कोटी रुपये काढले आहेत. याशिवाय त्यांनी कर्ज किंवा रोखे बाजारातून 4,431 कोटी रुपये आणि हायब्रीड माध्यमातून 9 कोटी रुपये काढले आहेत. अशाप्रकारे त्यांची निव्वळ विक्री 45,608 कोटी रुपये झाली आहे. यात प्रामुख्याने एफपीआय वित्तीय आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स विकले जात आहेत. याचे कारण हे आहे की, या शेअर्सचा FPIच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक वाटा आहे.

Scroll to Top