रिलायन्स कॅपिटलसाठी अदानी समूहाने लावली बोली

अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स कॅपिटलचा ताबा मिळवण्यासाठी अदानी फिनसर्व्ह ही कंपनी आघाडीवर असून अन्य ५३ कंपन्यांनीही बोली लावली आहे. यामध्ये अनेक नावाजलेल्या कंपन्याही आहेत. बोली लावण्यासाठी अंतिम तारीख २५ मार्च होती. बोली लावण्यासाठी अंतिम तारीख ११ मार्च होती. मात्र, काही कंपन्यांनी मुदत वाढवण्याची मागणी केल्यानंतर ही मुदत वाढवून देण्यात आली.

अनिल अंबांनीची रिलायन्स कॅपिटल ही कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली अडकली आहे. त्यामुळे या कंपनीचा लिलाव करण्यात येत असून अदानी फिनसर्व्ह, आयसीआयसीआय लोम्बार्ड, टाटा एआयजी, एचडीएफसी एर्गो आणि निप्पोन लाइफ इन्शुरन्स, यस बँक, बंधन फायन्शिअल होल्डिंग्स, चोलामंडलम इन्वेस्टमेंट, ओक ट्री कॅपिटल, ब्लॅकस्टोन, ब्रुकफील्ड, टीपीजी, केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्ससह ५४ कंपन्या लिलावात सहभागी झाल्या.

दिवाळखोरी कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेने रिलायन्स कॅपिटल या नॉन बँकिंग वित्तीय कंपनीवर कारवाई केली. या कंपनीच्या उपकंपन्यांमध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स यांचा समावेश आहे.

Scroll to Top