अस्थिर बाजारामुळे अनेक गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच पेनी स्टॉकमुळे अनेकांना फायदा झाला आहे. या पेनी शेअर्स ने पडझडीच्या काळात गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. बीएलएस इन्फोटेक लिमिटेड कंपनीचा शेअर वर्षभरापूर्वी ०.१९ पैसे होता. वर्षभरात या शेअरची किंमत 2.31 रुपयांवर पोहोचली. म्हणजेच वर्षभरात गुंतवणूकदारांना १००० टक्के नफा झाला आहे.
शैक्षणिक सेवा पुरवणारी या कंपनीची स्थापना 1985 मध्ये झाली होती. ही कंपनी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रम प्रदान करते. ही कंपनी कॉम्प्युटर पॉइंट लिमिटेड ऍप्लिकेशन पॅकेजची सर्वात मोठी फ्रँचायझी आहे. त्यांच्या सेवांमध्ये नियंत्रण, उत्पादन नियोजन आणि नियंत्रण, CPM/PERT विश्लेषण इत्यादींचा समावेश आहे.