देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेधारकांना अलर्ट दिला आहे. ३१ मार्चपर्यंत SBI च्या ग्राहकांनी पॅन-आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे न केल्यास बँकिंग सेवा बंद केली जाण्याची शक्यता असल्याचे SBI च्या ट्विटरवरून सांगण्यात आले आहे.
ट्विटरमध्ये SBI ने म्हंटले आहे की, \”आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देतो की, कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आणि बँकिंग सेवेचा सुरु राहण्यासाठी पॅन आधारशी लिंक करा. यासोबतच पॅनला आधारशी लिंक करणं अनिवार्य असल्याचंही बँकेकडून सांगण्यात आलंय.
असं करा लिंक
- सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा.
- यानंतर, डाव्या बाजूला आधार लिंकचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल.
- जिथे तुम्हाला PAN, AADHAAR आणि आधारमध्ये तुमचं नाव टाकावं लागेल.
- तुमच्या आधार कार्डमध्ये तुमचे केवळ जन्म वर्ष असेल तर तुम्हाला आधार कार्डमध्ये I have only birth year या बॉक्सवर खूण करावी लागेल.
- नंतर कॅप्चा कोड टाका.
- यानंतर आधार लिंकवर क्लिक करा आणि तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक होईल