चिनी Huawei कंपनीच्या भारतीय कार्यालयांत आयकर विभागाचे छापे

नवी दिल्ली – चिनी दूरसंचार कंपनी Huawei च्या भारतातील अनेक कार्यालयांवर मंगळवारी आयकर विभागाने छापे टाकले. दिल्ली, गुरुग्राम (हरियाणा) आणि बंगळुरू येथील कार्यलयांवर छापे टाकण्यात आले असून यावेळी अधिकार्‍यांनी आर्थिक कागदपत्रे, खातेवही आणि कंपनीच्या नोंदींची तपासणी केली आणि काही नोंदी जप्त करण्यात आल्या आहेत. करचुकवेगिरीच्या तपासाचा भाग म्हणून हे छापे टाकण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

छापे टाकल्यानंतर कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार कंपनीने म्हटले आहे की, \”आम्हाला आयकर पथक आमच्या कार्यालयात आल्याची आणि काही कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. Huawei ला विश्वास आहे की भारतातील आमचे ऑपरेशन्स सर्व कायदे आणि नियमांचे पालन करुन सुरू आहे. अधिक माहितीसाठी आम्ही संबंधित सरकारी विभागांशी संपर्क साधू आणि नियमानुसार पूर्ण सहकार्य करू आणि योग्य प्रक्रियेचे पालन करू.

दरम्यान, सध्या भारतात ५जी साठी चाचपणी सुरू आहे. या चाचपणीमध्ये भारताने Huawei ला वगळ‌ले आहे.

Scroll to Top