SBI Mutual Fund: एसबीआयने खातेधारकांसाठी एक नवीन गुंतवणूक योजना सुरू केली आहे. बँकेने जननिवेश एसआयपी नावाने गुंतवणूक योजना सुरू केली आहे. या योजनेला एसबीआय म्युच्युअल फंडसोबत मिळून लाँच करण्यात आले आहे.
एसबीआयच्या या योजनेंतर्गत गुंतवणुकदारांना अवघ्या 250 रुपयांपासून गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. सध्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे या योजनेत देखील सामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ शकते.
सध्या, ही योजना केवळ एसबीआय बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडसाठी उपलब्ध आहे. लवकरच सुविधा SBI YONO सोबतच Paytm, Groww आणि Zerodha सारख्या इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरूनही या योजनेत गुंतवणूक करता येईल.
लक्षात घ्या की जननिवेश SIP मधून मिळणारी संपूर्ण रक्कम एसबीआय बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडमध्ये गुंतवली जाईल. ही एसबीआय म्युच्युअल फंडची एक हायब्रीड स्कीम आहे. डायनॅमिक असेट अलोकेशन फंड हे देखील बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडचेच दुसरे नाव आहे.
30 वर्षांनी मिळतील 17 लाख रुपये
एसआयपी हा दीर्घकालीन गुंतवणुकीचे पर्याय आहे. समजा, तुम्ही दरमहिन्याला 250 रुपयांची गुंतवणूक केल्यास 30 वर्षांनी 90 हजार रुपये मुद्दल जमा होईल. समजा, यावर दरवर्षी 15 टक्के परतावा मिळाला व त्यावर चक्रवाढ व्याज मिळाले. तर अशाप्रकारे, 30 वर्षांनी तुम्हाला 17 लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळेल.