आयसीआयसीआय बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले

आयसीआयसीआय बँकेने आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील अर्थात फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात 5 ते 10 आधार अंकांची वाढ केली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले असून 2 कोटी ते 5 कोटी रुपयांवरच्या फिक्स्ड डिपॉजिटवर ही व्याजदरवाढ करण्यात आली आहे.

बँकेने 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. बँकेच्या 3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्ष आणि 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 4.6 टक्के व्याजदर आहे. तसेच 271 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 3.70 टक्के व्याज दिले जात आहे.

Scroll to Top