आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये घसरण

काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सकाळच्या सत्रात २६० अंशांची उसळी घेत ५८,१२७.९५ अंशांवर पोहोचला होता. मात्र दुपारच्या सत्रात नफावसुलीला सुरुवात झाल्याने दिवसअखेर ५७१.४४ अंशांच्या घसरणीसह तो ५७,२९२.४९ पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १६९.४५ अंशांची घसरण घसरण झाली आणि तो दिवसअखेर १७,११७.६० वर बंद झाला. रशिया-युक्रेनमधील युद्ध अजूनही शमण्याची चिन्हे दिसत नसल्याने जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या दरात वाढ झाल्याने त्याचे पडसाद सोमवारी देशांतर्गत भांडवली बाजारात उमटले.

दरम्यान, काल बँकिंग, माहिती तंत्रज्ञान आणि तेल कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाल्याने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रीड (२.९३ टक्के), एशियन पेंट्स (२.८५ टक्के), अल्ट्राटेक सिमेंट (२.८१ टक्के), कोटक बँक (२.४२ टक्के), हिंदूस्तान युनिलीव्हर (२.४१ टक्के) आणि एचसीएल टेक्नोलॉजीजच्या (२.३२ टक्के) समभागात घसरण झाली.

Scroll to Top