Home / अर्थ मित्र / सोने दरात मोठी घसरण

सोने दरात मोठी घसरण

भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात मागील आठवड्यात घसरण झाली. गेल्या आठवड्याभरात 24 कॅरेट सोन्याचा भाव 397 रुपयांनी कमी झाला. तर...

भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात मागील आठवड्यात घसरण झाली. गेल्या आठवड्याभरात 24 कॅरेट सोन्याचा भाव 397 रुपयांनी कमी झाला. तर चांदीचा भाव 409 रुपयांनी कमी झाला. तर आता सोने दर सर्वोच्च स्तरावरून जवळपास 4000 रुपये कमी झाला आहे.

एमसीएक्सवर सोन्याचा भाव शुक्रवारी 51,475 रुपयांवर बंद झाला, जो गुरुवारच्या दरापेक्षा 0.33 टक्क्यांनी कमी आहे. याआधी सोन्याचा सर्वोच्च दर 55,558 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.

दरम्यान, जाणकारांच्या मते, रशियावर सुरू असलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे सोन्याच्या किंमतीवर काही दिवसांत दबाव दिसू शकतो, परंतु त्याचा परिणाम मध्यम ते दीर्घकाळात सकारात्मक होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या