नाशिक -आर्थिक नियमांचे उल्लंघन आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी रिजर्व्ह बँकेने नाशिकच्या इंडिपेडन्स बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे खातेदारांमध्ये खळबळ माजली आहे. कारण बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून इंडिपेडन्स बँकेच्या विरुद्ध सहकार विभाग आणि रिजर्व्ह बँकेकडे तक्रारी येत होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने चौकशी करून इंडिपेडन्स बँकेचा परवाना रद्द करण्याचा प्रस्तावही तयार केला होता. आणि तो रिजर्व्ह बँकेला पाठवला होता. तसेच बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याचाही प्रस्ताव होता. बँक दिवाळखोरीत असुन्बंकेकडे पुरेसे भांडवल आणि कामकाजासाठी योग्य स्थिती नसल्याचे रिजर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँकिंग नियम कायदा १९४९ च्या कलम ५६ सह अन्य कलमातील तरतुदींचे पालन बँकेकडून झालेले नाही. त्यामुळे बँकेला यापुढे कामकाज करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. १९६१ च्या तरतुदींच्या आदिन राहून ,बँक दिवाळखोरीत निघाली तरी ठेवीदाराला ठेवींच्या पाच लाख रुपया पर्यंतच्या आर्थिक मार्यादे पर्यंतची ठेव विमाविमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार राहणार आहे.
या बँकेची स्थापना दोन दशकांपूर्वी झाली असून सातशेहून अधिक सभासद आहेत. बँकेचे संस्थापक अध्यक्ष रौफ पटेल असुन्योगेश खरे अध्यक्ष आहेत. आणि आमदार सीमा हिरे उपाध्यक्ष आहेत .