नवी दिल्ली- बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते राजकुमार यांच्या पत्नी गायत्री पंडित यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून गायत्री पंडित आजारी होत्या. तसेच त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
राजकुमार आणि गायत्री यांची भेट एका विमान प्रवासादरम्यान झाली होती. गायत्री या हवाई सुंदरी होत्या. गायत्री या अँग्लोइंडियन होत्या आणि त्यांचे नाव जेनिफर होते. १९६० साली राजकुमार यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्यांनी जेनिफर यांचे नाव बदलून गायत्री कुमार केले. त्यांना तीन अपत्ये आहेत. १९९६ साली कर्करोगाच्या आजाराने राजकुमार यांचे निधन झाले.