UGC NET जून 2025 परीक्षा: अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या शुल्क-पात्रतासह संपूर्ण माहिती

UGC NET June 2025

UGC NET June 2025 | नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रोजी यूजीसी राष्ट्रीय पात्रता परीक्षा जून 2025 (UGC NET June 2025) सत्राची अधिसूचना जारी केली आहे. यासोबतच, यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया देखील आ सुरू झाली आहे.

अर्ज (UGC NET Application Form 2025) करण्याची अंतिम तारीख 8 मे 2025 रात्री 11:59 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी करेक्शन विंडो 9 मे ते 10 मे 2025 पर्यंत खुली राहील. यूजीसी नेट जून 2025 परीक्षेची संभाव्य तारीख 21 जून ते 30 जून 2025 दरम्यान आहे.

अर्ज शुल्क:

  • जनरल कॅटेगरी – ₹1150
  • ईडब्ल्यूएस व ओबीसी एनसीएल कॅटेगरी – ₹600
  • एससी, एसटी, दिव्यांग कॅटेगरी – ₹325

पात्रता:

  • यूजीसीद्वारे (UGC NET Eligibility) मान्यताप्राप्त विद्यापीठे/संस्थांकडून मास्टर डिग्री किंवा समकक्ष परीक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे. (ओबीसी नॉन-क्रीमी लेयर/एससी/एसटी/पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांच्या बाबतीत 50% गुण).
  • चार वर्षांचे पदवीधर विद्यार्थी देखील नेट परीक्षा देऊ शकतात. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना ज्या विषयात पीएचडी करायची आहे, त्या विषयात नेट परीक्षा देण्याची परवानगी आहे, त्यांनी कोणत्याही विषयात चार वर्षांची पदवी घेतली असली तरी.
  • चार वर्षे किंवा आठ सेमिस्टरच्या पदवी अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एकूण किमान 75% गुण किंवा समकक्ष ग्रेड असणे आवश्यक आहे.

UGC NET June 2025 साठी अर्ज कसा करावा:

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर जावे.
  • त्यानंतर होम पेजवर दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करावे.
  • आता आपली माहिती टाकून नोंदणी करावी.
  • आता अर्ज भरा आणि शुल्क जमा करा.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करा.
  • आता कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा आणि भविष्यासाठी प्रिंट आउट घ्या.

यूजीसी-नेट ही भारतीय नागरिकांची पात्रता निश्चित करण्यासाठीची परीक्षा आहे, जी (i) ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती’, (ii) ‘सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि पीएचडीमध्ये प्रवेश’ (iii) पीएचडीमध्ये प्रवेश यासाठी घेतली जाते.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) 85 विषयांसाठी कॉम्प्युटर आधारित टेस्ट (CBT) मोडमध्ये यूजीसी-नेट जून 2025 परीक्षा आयोजित करेल.

यूजीसी नेट डिसेंबर परीक्षेसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास, उमेदवार एजन्सीच्या हेल्पलाइन नंबर- 011-40759000 आणि 011-69227700 किंवा ugcnet@nta.ac.in ई-मेलवर संपर्क साधू शकतात.