Thousands protest against Donald Trump | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या धोरणांविरोधात अमेरिकेभरात तीव्र आंदोलन सुरू झाले असून, देशातील विविध शहरांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. या निदर्शनांमध्ये नागरिकांनी टॅरिफ (Tariff), कर्मचाऱ्यांच्या कपाती (Job Cuts), अर्थव्यवस्थेची स्थिती (US Economy) आणि मानवाधिकारांचे उल्लंघन (Human Rights) यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपला तीव्र निषेध नोंदवला.
वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, फ्लोरिडा, ह्यूस्टन, कोलोराडो आणि लॉस एंजेलिस (Los Angeles) अशा प्रमुख शहरांमध्ये ‘हँड्स ऑफ’ या शीर्षकाखाली आंदोलन करण्यात आले. या निदर्शनांमध्ये नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, माजी सैनिक तसेच निवडणूक कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. एकूण 1000 पेक्षा अधिक निदर्शने देशभरात आयोजित करण्यात आली.
न्यूयॉर्कमधील (New York) चित्रकार शायना केसनर यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, “सरकारची धोरणे अन्यायकारक आहेत. सामान्य नागरिकांसाठी ही धोरणे घातक ठरत आहेत.” दुसऱ्या एका आंदोलकाने सांगितले की, “न्यू हॅम्पशायरहून तब्बल 100 जण ट्रम्प प्रशासनाविरोधात निषेध करण्यासाठी येथे आले आहेत.”
या निदर्शनांमध्ये तिसऱ्या लिंगाच्या अधिकारांवर देखील चर्चा झाली. अध्यक्षपदाच्या काळात ट्रम्प यांनी “फक्त पुरुष आणि महिला” हीच दोनच लिंग ओळख असल्याचे जाहीर केले होते, आणि इतर लिंगांना नाकारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे या निर्णयाविरोधात LGBTQ समुदायानेही निषेध नोंदवला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारतासह चीन, कॅनडा, मलेशिया, व्हिएतनाम यांसारख्या देशांवर नव्याने टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. भारतावर त्यांनी 26 टक्के शुल्क लावण्याचा इशारा दिला होता. या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणालाही अनेकांनी या आंदोलनात विरोध केला.