US Immigration Law Change | अमेरिकेत आता 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी राहणाऱ्या विदेशी नागरिकांना (Foreign Nationals in USA) सक्तीने संघीय अधिकाऱ्यांकडे नोंदणी (Immigration Registration Rule) करावी लागणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या (Trump Administration) पाठिंब्याने लागू करण्यात आलेल्या या नव्या आदेशाचे उल्लंघन केल्यास $5,000 पर्यंतचा दंड, 30 दिवसांचा तुरुंगवास किंवा देशाबाहेर हकालपट्टी (Deportation) यांसारख्या कठोर शिक्षा होऊ शकतात.
दुसऱ्या महायुद्धातील एका जुन्या कायद्यावर आधारित या नव्या धोरणाला यूएस जिल्हा न्यायाधीश ट्रेव्हर एन. मॅकफॅडेन यांनी मंजुरी दिली आहे. नागरी हक्क गटांनी (Civil Rights Groups) दाखल केलेले आव्हान त्यांनी फेटाळले असून, याचिकाकर्त्यांकडे अंमलबजावणी थांबवण्यास पुरेसा कायदेशीर आधार नसल्याचे नमूद केले.
या आदेशामुळे अमेरिकेतील इमिग्रेशन नियमांमध्ये मोठा बदल (US Immigration Law Change) होणार असून, व्हिसा, ग्रीन कार्ड व वर्क परमिट धारकांसह सर्व गैर-नागरिकांना आता नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यांना 24 तास वैध कागदपत्रे बाळगणे आणि अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास ती सादर करणे आवश्यक राहणार आहे.
व्हाईट हाऊसच्या (White House) प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी सांगितले की, “जर कोणी विदेशी नागरिक 30 दिवसांपेक्षा जास्त अमेरिकेत राहत असेल आणि त्यांनी नोंदणी केली नाही, तर त्यांना अटक केली जाईल, दंड ठोठावला जाईल आणि भविष्यात अमेरिकेत परत येण्यावर बंदी घालण्यात येईल.”
व्हाईट हाऊसच्या (White House) प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी सांगितले की, “जर कोणी विदेशी नागरिक 30 दिवसांपेक्षा जास्त अमेरिकेत राहत असेल आणि त्यांनी नोंदणी केली नाही, तर त्यांना अटक केली जाईल, दंड ठोठावला जाईल आणि भविष्यात अमेरिकेत परत येण्यावर बंदी घालण्यात येईल.”
किशोरांनाही नोंदणी बंधनकारक
14 वर्षांची मुले (Immigrant Teens) झाल्यावर त्यांना 30 दिवसांच्या आत फिंगरप्रिंट देऊन नोंदणी करावी लागणार आहे. तसेच, 11 एप्रिल 2025 किंवा त्यानंतर अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या कोणत्याही विदेशी नागरिकांनी 30 दिवसांच्या आत नोंदणी (Mandatory Immigration Reporting) न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.
इमिग्रंट अॅडव्होकेसी गटांनी (Immigration Advocacy Groups) या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत याला वंशभेदी आणि भितीदायक धोरण म्हटले आहे.