Spain Portugal Blackout: अंधारात अडकले देश! स्पेन-पोर्तुगालमध्ये ‘बत्ती गुल’, अभूतपूर्व वीज संकट; जनजीवन ठप्प

Spain Portugal Blackout | स्पेन (Spain) आणि पोर्तुगालमधील (Portugal) अनेक भागात सोमवारी (28 एप्रिल) वीजपुरवठा (pain Portugal Blackout) खंडित झाला होता. आता बहुतांश भागात वीजपुरवठा हळूहळू पूर्ववत होऊ लागला आहे.

इबेरियन द्वीपकल्पाच्या (Iberian peninsula) काही भागांमध्ये अचानक वीज गेल्यानं संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली होती. विमाने जमिनीवरच थांबली, सार्वजनिक वाहतूक कोलमडली आणि रुग्णालयांना नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या होत्या.

अचानक देशातील अनेक भागांमधील वीज गेल्याने स्पेनच्या गृह मंत्रालयानं तातडीची राष्ट्रीय आणीबाणी (national emergency) जाहीर केली आणि देशभरात 30,000 पोलीस तैनात करण्यात आले. स्पेन व पोर्तुगालच्या सरकारांनी तातडीच्या मंत्रिमंडळ बैठका घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. युरोपमध्ये इतक्या व्यापक स्वरूपात वीजपुरवठा खंडित होणं अत्यंत दुर्मिळ आहे.

या वीज खंडितीचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पोर्तुगालनं हा प्रसंग स्पेनमध्ये घडल्याचं सांगितलं, तर स्पेननं फ्रान्ससोबतच्या कनेक्शनमध्ये बिघाड झाल्याचं म्हटलं आहे. पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो यांनी सायबर हल्ल्याचा (cyberattack) कोणताही पुरावा सापडलेला नसल्याचं स्पष्ट केलं आबे.

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी सांगितलं की पाच सेकंदांत देशानं 15 GW वीज गमावली, जी राष्ट्रीय मागणीच्या 60% इतकी आहे. या घटने मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्पेनमधील ग्रीड ऑपरेटर REE च्या मते, फ्रान्ससोबतच्या कनेक्शन फेल्युअर मुळे ही समस्या उद्भवली. REE चे अधिकारी एडुआर्डो प्रिएतो म्हणाले की वीज जाण्याचे प्रमाण युरोपीय ग्रीडच्या सहनशक्तीपेक्षा जास्त होतं, त्यामुळे स्पॅनिश आणि फ्रेंच ग्रीड डिस्कनेक्ट झाले.

दरम्यान, पोर्तुगालमधील ग्रीड ऑपरेटर REN चे जोआओ कॉन्सेइकॉ यांनी सांगितलं की इलेक्ट्रिकल व्होल्टेजमध्ये मोठा बदल झाल्याची शक्यता आहे, आणि हा बिघाड प्रथम स्पॅनिश ग्रीडमध्ये झाला.

वीजपुरवठा हळूहळू पूर्ववत

स्पेनच्या बास्क प्रदेशात आणि बार्सिलोनात दुपारी वीजपुरवठा सुरू झाला आणि रात्री माद्रिदमध्येकाही भागांमध्ये वीज आली. सोमवारी उशिरापर्यंत 61% वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. 89 पैकी 85 वीज उपकेंद्र (power substations) पुन्हा कार्यान्वित झाली आहेत.

दुकाने बंद, वाहतूक कोलमडली

या वीजपुरवठा खंडितीमुळे माद्रिद, कॅटलोनिया आणि पोर्टो यांसारख्या शहरांमध्ये रुग्णालयांची नियमित कामकाजे थांबली. तेल शुद्धीकरण कारखाने बंद पडले आणि लिडल (Lidl), आयकेईए (IKEA) सारख्या दुकांनी आपली कामकाज बंद केलं होते.

पोर्टुगालमध्ये देशभरातील ट्रॅफिक लाईट्स बंद पडले आणि लिस्बन व पोर्टोमध्ये मेट्रो सेवा ठप्प झाली. रेल्वे गाड्याही दोन्ही देशांत रद्द करण्यात आल्या. रेल्वे स्टेशनबाहेर शेकडो प्रवासी अडकले होते.

बँक ऑफ स्पेनने बॅकअप प्रणालीवर इलेक्ट्रॉनिक बँकिंग (electronic banking) चालू असल्याचं सांगितलं, तरी काही एटीएम बंद पडल्याचं नागरिकांनी सांगितलं. क्लाउडफ्लेअर रडारनुसार, वीजपुरवठा खंडित झाल्याने पोर्तुगालमध्ये इंटरनेट ट्रॅफिकमध्ये 90% आणि स्पेनमध्ये 80% घट झाली होती.

युरोपमध्ये अशा प्रकारचं वीज खंडितीचं उदाहरण फारच कमी वेळा घडतं. 2003 मध्ये इटली व स्वित्झर्लंडमध्ये जलविद्युत वीज लाईनमध्ये बिघाड झाल्यानं संपूर्ण इटलीत 12 तास वीजपुरवठा बंद झाला होता. 2006 मध्ये जर्मनीत वीज नेटवर्क ओव्हरलोड झाल्याने युरोपच्या काही भागात आणि मोरोक्कोपर्यंत वीज गेली होती.

एम्बर (Ember) या थिंक टँकनुसार, सध्या स्पेनच्या एकूण वीज निर्मितीपैकी सुमारे 43% वीज वाऱ्यापासून व सौर ऊर्जेपासून येते, 20% अणुऊर्जेतून तर 23% जीवाश्म इंधनांपासून (fossil fuels) मिळते.

Share:

More Posts