Share market Crash | भारतीय शेअर बाजारातील जोरदार घसरणीचा मोठा फटका देशातील आघाडीच्या उद्योगपतींना बसला आहे. फोर्ब्सच्या ‘रिअल टाइम अब्जाधीश यादी’नुसार, पाच प्रमुख भारतीय अब्जाधीशांनी मिळून तब्बल $9.89 अब्ज गमावले आहेत. ही घसरण ‘ब्लॅक मंडे’ म्हणून ओळखली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आयात शुल्कवाढ धोरणामुळे सुरू झालेल्या जागतिक व्यापार तणावाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला.
पाच अब्जाधीशांचे नुकसान:
मुकेश अंबानी (Mukesh Ambani)
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत सोमवारी $2.9 अब्ज घट झाली. त्यांची एकूण संपत्ती आता $88.4 अब्ज झाली आहे.
गौतम अदानी (Gautam Adani)
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत $2.8 अब्ज घट झाली असून त्यांची एकूण संपत्ती $57.6 अब्जवर पोहोचली आहे.
सावित्री जिंदल (Savitri Jindal)
जिंदल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदल यांना $2.3 अब्ज नुकसान सहन करावे लागले असून त्यांची संपत्ती आता $33.8 अब्ज इतकी आहे.
कुशल पाल सिंग (Kushal Pal Singh)
डीएलएफचे संस्थापक कुशल पाल सिंग यांनी $988 दशलक्ष गमावले. त्यांच्या एकूण संपत्तीची रक्कम $13.5 अब्जवर आली आहे.
शिव नाडर (Shiv Nadar)
एचसीएल टेकचे सह-संस्थापक शिव नाडर यांच्या संपत्तीत $902 दशलक्ष घट झाली असून त्यांची एकूण संपत्ती आता $31.5 अब्ज आहे.
जगभरातही मोठा परिणाम
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील अब्जाधीशांची संपत्तीही घटली आहे.
- एलॉन मस्क (Elon Musk): $130 अब्ज घट
- जेफ बेझोस (Jeff Bezos): $45.2 अब्ज नुकसान
- मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg): $28.1 अब्ज घट
- बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault): $18.6 अब्ज फटका
- बिल गेट्स (Bill Gates): $3.38 अब्ज घट
वॉरेन बफेट ठरले अपवाद
दुसरीकडे प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट (Warren Buffett) हे एकमेव अब्जाधीश आहेत, ज्यांना बाजारातील चढउताराचा फटका बसलेला नाही. यावर्षी त्यांनी आतापर्यंत $12.7 अब्ज कमावले असून त्यांची एकूण संपत्ती $155 अब्ज झाली आहे.
अमेरिकन बाजाराची स्थिती
ट्रम्प यांच्या नव्या धोरणांमुळे वॉल स्ट्रीटवरही परिणाम झाला असून एकूण $8 ट्रिलियनचे नुकसान झाले आहे. यातील $5 ट्रिलियनचे नुकसान केवळ गेल्या दोन दिवसांतच झाले आहे. हे शुल्कवाढीचे प्रमाण गेल्या 100 वर्षांतील सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे.