Russia-Ukraine war | रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये (Ukraine) ईस्टरच्या निमित्ताने एकतर्फी युद्धविराम (Easter Ceasefire) जाहीर केला आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री 8.30 पासून रविवारी अखेरपर्यंत हा युद्धविराम लागू राहील, अशी माहिती रशियाकडून कडून देण्यात आली आहे.
पुतिन यांनी सांगितले की, “मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही आमचे सैनिकी कारवाया थांबवत आहोत. आम्ही आशा करतो की युक्रेनही आमच्या या निर्णयाचे पालन करेल.” मात्र, त्यांनी रशियाच्या सैन्यप्रमुखांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, युक्रेनने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यास त्वरित प्रत्युत्तर द्यावे असे स्पष्ट केले आहे.
पुतीन यांनी ईस्टर युद्धविरामाची घोषणा करताना म्हटले, “हा युद्धविराम प्रस्ताव दाखवेल की युक्रेन शांतता करारांचे पालन करण्यासाठी आणि शांतता चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा दर्शवण्यात किती प्रामाणिक आहे.” यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये ईस्टर आणि जानेवारी 2023 मध्ये ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या निमित्ताने युद्धविराम लागू करण्याचे प्रयत्न झाले होते, परंतु दोन्ही पक्ष त्यावर सहमत झाले नव्हते.
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी मात्र रशियाच्या युद्धविरामाच्या दाव्यांवर विश्वास ठेवलेला नाही. त्यांनी शनिवारी झालेल्या ड्रोन हल्ल्याचे उदाहरण देत, रशिया खोटे बोलत असल्याचा आरोप केला.
दरम्यान, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ (Marco Rubio) हे युद्धविरामासाठी प्रयत्नशील असून, शांती चर्चेच्या संथ गतीमुळे अमेरिका नाराज असल्याचे बोलले जात आहे. ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, चर्चा निष्फळ राहिल्यास अमेरिका माघार घेईल.
या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर, सुमी शहरावर रशियन क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात 34 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 117 जण जखमी झाले. हा हल्ला 2025 मधील सर्वात प्राणघातक हल्ला ठरला आहे.