लवकरच जमा होणार पीएम किसानचा पुढचा हप्ता, त्वरित पूर्ण करा ‘हे’ काम; अन्यथा मिळणार नाहीत पैसे

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते जमा करण्यात आले आहेत. या (PM Kisan Yojana) योजनेतील पुढील म्हणजेच 20वा हप्ता (20th installment) जून महिन्यात जारी केला जाण्याची शक्यता आहे.

2018 पासून सुरु झालेली ही योजना ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर चार महिन्यांनी रुपये 2,000 इतकी रक्कम थेट जमा केली जाते. म्हणजेच वर्षाला एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांना लाभरूपात मिळतात.

19वा हप्ता फेब्रुवारीत जारी; आता 20व्या हप्त्याची प्रतीक्षा

योजनेचा 19वा हप्ता (PM Kisan 19th installment) 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारमधील भागलपूर (Bhagalpur, Bihar) येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात वितरित करण्यात आला होता. त्यानंतर आता एक महिना उलटून गेल्याने, नेहमीच्या चार महिन्यांच्या चक्रानुसार, पुढील हप्ता जून 2025 मध्ये देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘किसान पहचान पत्र’ नसल्यास हप्ता रोखला जाईल

केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण सूचना जारी करत सांगितले आहे की, योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी ‘किसान पहचान पत्र’ (Kisan Pehchan Patra) असणे आवश्यक आहे. हे ओळखपत्र 30 एप्रिल 2025 पर्यंत तयार करून घेणे बंधनकारक करण्यात आले असून, उशीर झाल्यास हप्ता अडकण्याचा धोका आहे.

हप्त्याची स्थिती ऑनलाइन तपासा

योजनेच्या हप्त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन तपशील पाहता येतो. त्यासाठी खालील प्रक्रिया वापरता येईल:

  • pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा
  • ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा
  • उघडलेल्या विंडोमध्ये तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) प्रविष्ट करा
  • ‘Get OTP’ वर क्लिक करा
  • मोबाईलवर आलेला OTP टाका
  • त्यानंतर तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही, याची माहिती स्क्रीनवर दिसेल