3 तासात गाडी होणार 90% चार्ज! ‘मेड इन इंडिया’ वायरलेस चार्जर येतोय बाजारात

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) देशातील ऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना दिली आहे. मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील इलेक्ट्रॉनिक्स निकेतनमध्ये विविध उद्योगांसोबत करार झाले. या करारांत (TOT/MOU/MOA) NAMPEIT कार्यक्रमांतर्गत विकसित तंत्रज्ञानांचा वापर करून व्यावसायीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पावले उचलण्यात आली.

स्वदेशी वायरलेस EV चार्जरचे व्यावसायीकरण

C-DAC (T) आणि VNIT नागपूर यांनी एकत्र तयार केलेला 1.5 किलोवॅटचा वायरलेस चार्जरचा वापर आता व्यावसायिक कामासाठी केला जाणार आहे. Messrs Global Business Solution Pvt. Ltd. या कंपनीला तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यात आले. हा चार्जर 230V, 50Hz सिंगल-फेज AC सप्लायवर चालतो. तो 48V वर 30A करंटद्वारे सुमारे 3 तासांत 4.8kWh बॅटरी चार्ज करू शकतो. चार्जरमध्ये 88kHz वर चालणारे Silicon Carbide आधारित MOSFET तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्याला शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किटसारख्या सुरक्षा यंत्रणाही आहेत. या चार्जरचा इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

भारतीय रेल्वेसाठी स्वदेशी प्रोपल्शन सिस्टम

भारतीय रेल्वेचे इंजिन स्वदेशी तंत्रज्ञानावर चालवण्यासाठी करार करण्यात आला आहे. C-DAC, Chittaranjan Locomotive Works (CLW), दौलत राम इंजिनिअरिंग (Bhopal) आणि JMV LPS Ltd. (Noida) यांच्यात सामंजस्य करार झाला. या भागीदारीतून 3-फेज इंजिनांसाठी प्रोपल्शन प्रणाली तयार होईल. यात 2 x 2.5 MVA ट्रॅक्शन कन्वर्टर्स, 3 x 130 kVA सहाय्यक कन्वर्टर्स आणि आधुनिक TCMS प्रणालीचा समावेश असेल. ही प्रणाली रेल्वेच्या 2030 पर्यंत पूर्ण विद्युतीकरणाच्या उद्दिष्टाला गती देईल. प्रोटोटाइप चाचणी, उत्पादन अभियांत्रिकी आणि क्षेत्र चाचणी ही कामं भागीदार कंपन्यांमार्फत होतील.

48V LVDC प्रणालीसाठी K-DISC करार

C-DAC आणि केरळ डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन स्ट्रॅटेजिक कौन्सिल (K-DISC) यांच्यात 48V Low Voltage DC प्रणालीसाठी करार झाला आहे. ही प्रणाली ऊर्जा बचत, स्वच्छ ऊर्जा वापर आणि किफायतशीर वीज वितरणासाठी उपयुक्त आहे. केरळमधील K-DISC मुख्यालयात ही प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे ते 48V DC वर चालणारे राज्यातील पहिले प्रशासकीय भवन ठरले. या प्रणालीमुळे 20% ते 30% ऊर्जा बचत शक्य आहे. ही तंत्रज्ञान 2050 कार्बन न्युट्रल रोडमॅप आणि 2070 नेट झिरो व्हिजनला पूरक ठरते.

NAMPEIT कार्यक्रम – स्वदेशी तंत्रज्ञानासाठी मिशन मोड

NAMPEIT (National Mission on Power Electronics Technology) हा MeitY चा विशेष कार्यक्रम आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचे संशोधन, विकास, चाचणी, प्रत्यक्ष कार्यान्वयन आणि व्यवसायीकरण यांचा समावेश आहे. C-DAC, Thiruvananthapuram ही नोडल एजन्सी आहे. या उपक्रमात शिक्षण संस्था, R&D संस्था आणि उद्योग सहभागी आहेत. हे कार्यक्रम मायक्रोग्रिड, हरित ऊर्जा, ई-मोबिलिटी, स्मार्ट ग्रिड्स, कृषी, अन्न प्रक्रिया, आरोग्य, आणि स्टार्टअप्ससाठी प्लॅटफॉर्म निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतात.