Intel Layoffs : गुगल, मायक्रोसॉफ्ट पाठोपाठ आता इंटेलचा मोठा निर्णय, तब्बल 21 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Intel Layoffs

Intel Layoffs | जगप्रसिद्ध चिप निर्माता कंपनी इंटेल (Intel) लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपोर्टनुसार, कंपनी याच आठवड्यात जवळपास 20% कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची तयारी करत आहे. हा निर्णय कंपनीतील अनावश्यक ‘ब्युरोक्रसी’ कमी करण्यासाठी, व्यवस्थापन अधिक सुलभ करण्यासाठी आणि पुन्हा अभियांत्रिकी-केंद्रित (engineering-focused) संस्कृती उभारण्यासाठी केली जात आहे.

ही नोकरकपात कंपनीचे नवे सीईओ लिप-बू टॅन (Lip-Bu Tan) यांच्या नेतृत्वातील पहिले मोठी पाऊल असणार आहेत. त्यांनी अलीकडेच एका टाउन हॉलमध्ये कर्मचाऱ्यांना ‘कठोर निर्णय’ घेण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले होते. टॅन यांनी यापूर्वी कॅडेन्सचे सीईओ म्हणून काम केले आहे आणि 65 वर्षीय टॅन हे तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व मानले जाते.

अद्याप नोकरकपातीची अचूक वेळ व प्रभावित कर्मचाऱ्यांची संख्या जाहीर झालेली नसली, तरी याचा परिणाम जगभरातील हजारो कर्मचाऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. 2023 च्या ऑगस्टमध्ये कंपनीने 15% टाळेबंदी करत सुमारे 15,000 कर्मचाऱ्यांना कमी केले होते. त्यामुळे यंदाची कारवाई त्याहून मोठी असण्याची शक्यता आहे. यंदा जवळपास 21 हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते.

AI आणि चिप उत्पादनावर केंद्रित योजना

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, टॅन यांचे नेतृत्व इंटेलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि चिप उत्पादन ( क्षेत्रातील पुनर्बांधणीवर केंद्रित आहे. त्यांनीकंपनीची अंतर्गत रचना अधिक कार्यक्षम बनवण्यावर भर दिला आहे. त्यांच्या मते, यामुळे निर्णय घेण्याचा वेग वाढेल आणि नवकल्पनांना अधिक वाव मिळेल.

2024 मध्ये इंटेलने $19 अब्ज इतका आर्थिक तोटा नोंदवला होता, जो 1986 नंतरचा सर्वात मोठा तोटा होता. एकेकाळी PC आणि डेटा सेंटर क्षेत्रात दबदबा असलेली ही कंपनी Nvidia व Arm यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांमुळे मागे पडली आहे, विशेषतः वेगाने वाढणाऱ्या AI चिप (AI chips) मार्केटमध्ये कंपनी मागे पडल्याचे दिसून आले आहे.

टेक उद्योगात टाळेबंदीचा ट्रेंड कायम

2025 मध्येही टेक उद्योगात नोकरकपातीची मालिका सुरूच आहे. Layoffs.fyi च्या माहितीनुसार, यावर्षी आतापर्यंत 93 कंपन्यांमध्ये 23,500 हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. Google, Microsoft, Meta, TikTok, Ola Electric आणि Siemens यांसारख्या कंपन्यांनीही कार्यक्षमतेसाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे.