Pahalgam Terror Attack: भारताने उचलले मोठे पाऊल, INS विक्रांत अरबी समुद्रात तैनात, किती शक्तीशाली आहे ही युद्धनौका?

INS Vikrant

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने त्वरित संरक्षणात्मक पावले उचलली आहेत. या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने आपला स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) अरबी समुद्रात तैनात केली आहे.

ही हालचाल पाकिस्तानकडून ग्वादरजवळ क्षेपणास्त्र चाचणी (missile test) सुरू असल्याच्या गुप्त माहितीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे, त्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव अधिक गडद झाला वाढला आहे.

रिपोर्टनुसार, INS विक्रांत सध्या कारवार किनाऱ्याच्या जवळ गस्त घालत आहे. MiG-29K लढाऊ विमानं, हल्ला करणारी हेलिकॉप्टर्स आणि अन्य नौदल संसाधनांनी सज्ज असलेले हे युद्धपोत भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेचा बळकट भाग बनले आहे.

भारताची सामरिक तयारी: INS विक्रांतची ताकद

INS विक्रांत ही भारतातच तयार झालेली 262 मीटर लांब आणि 45,000 टन वजनाची अत्याधुनिक युद्धनौका आहे. यात 14 डेक्स, 2,300 कंपार्टमेंट्स आणि 1,500 नौदल जवानांची क्षमता आहे. हे युद्धपोत 30 विविध प्रकारची विमानं वाहून नेऊ शकते, ज्यामध्ये MiG-29K, Kamov 31, MH-60R, आणि ALH हेलिकॉप्टर्स यांचा समावेश आहे.

या युद्धनौकेमध्ये STOBAR प्रणाली (STOBAR system) वापरून विमानं स्की-जंपद्वारे उड्डाण करतात आणि अरेस्टर वायर्सच्या सहाय्याने उतरतात. 88 मेगावॅट वीज निर्माण करणाऱ्या चार गॅस टर्बाइन्सच्या मदतीने हे जहाज 28 नॉट्स (knots) पर्यंत वेगाने धावू शकते.

INS विक्रांतची निर्मिती आणि स्वदेशीकरण

INS विक्रांतचे 76% भाग स्वदेशी आहेत. BEL, BHEL, GRSE, लार्सन अँड टुब्रो यांसारख्या कंपन्यांबरोबर 100 पेक्षा अधिक MSMEs ने या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. जहाजाचे संचालन आणि सुरक्षा यंत्रणा उच्च दर्जाच्या ऑटोमेशनवर आधारित आहेत.

पाकिस्तानच्या हालचाली आणि भारताची सज्जता

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने ग्वादरजवळ क्षेपणास्त्र तैनात करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने INS विक्रांतची तैनाती करून एक स्पष्ट संदेश दिला आहे की, देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी भारत सज्ज आहे.