भारताची मोठी कामगिरी! तयार केले ‘स्टार वॉर्स’ क्षमतेचे शस्त्र, ड्रोन हल्ल्यांना आता लेझरने प्रत्युत्तर

India laser weapon test | भारताने पहिल्यांदाच अत्याधुनिक लेझर डायरेक्टेड एनर्जी वेपन (Direct Energy Weapon) प्रणालीची यशस्वी चाचणी (India laser weapon test) करत संरक्षण क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) विकसित केलेल्या या शस्त्राने ड्रोन लक्ष्यावर (DRDO anti-drone system) अचूक हल्ला करत ते नष्ट केले.

या प्रणालीने स्थिर पंखांच्या मानवरहित यंत्रणा (UAV) आणि ड्रोन्सला लक्ष्य करत, त्यांचे सेन्सर्स व अँटेना निष्क्रिय केले. ही चाचणी DRDO च्या CHESS (Centre for High Energy Systems and Sciences) प्रयोगशाळेत पार पडली.

भारत (Laser DEW system India) आता अमेरिका , रशिया , चीन आणि इस्रायल यांच्यासारख्या उच्च-शक्तीच्या लेझर शस्त्र क्षमता असलेल्या देशांच्या यादीत दाखल झाला आहे.

DRDO अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “जगात ही क्षमता सादर करणाऱ्या देशांमध्ये भारत आता चौथा किंवा पाचवा आहे. ही केवळ प्रवासाची सुरुवात आहे. आम्ही असे अनेक तंत्र विकसित करत आहोत जे स्टार वॉर्स (India Star Wars technology) तंत्रज्ञानाचा भाग असतील.”

ही प्रणाली रडार किंवा अंगभूत इलेक्ट्रो-ऑप्टिक प्रणालीने लक्ष्य शोधते आणि प्रकाशाच्या वेगाने लेझर बीम फायर करून शत्रूचे ड्रोन निष्क्रिय करते. या प्रयोगाद्वारे Mk-II(A) DEW प्रणालीने लांब पल्ल्यावरील लक्ष्यांवरही अचूक हल्ला करून आपली क्षमता सिध्द केली आहे.

DRDO च्या CHESS या केंद्राने LRDE, IRDE, DLRL यांसारख्या संस्थांसह देशी शिक्षण संस्था आणि भारतीय औद्योगिक क्षेत्र (Indian Industry) यांच्यासमवेत ही प्रणाली विकसित केली.

हे शस्त्र महागड्या दारुगोळ्याशिवाय कार्यक्षमतेने कार्य करत असल्याने पारंपरिक क्षेपणास्त्रांपेक्षा खर्चिकदृष्ट्या लाभदायक ठरते. वाढती ड्रोन स्वार्म हल्ल्यांची (Drone Swarm Attacks) शक्यता लक्षात घेता, DEW प्रणाली भविष्यातील लढायांमध्ये गेमचेंजर ठरणार आहे.