ऑफिसमध्ये या अन्यथा राजीनामा द्या… Google चा कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतण्याचा इशारा

Google Return to Office Policy |

Google Return to Office Policy | कोव्हिड-19 महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली होती. मात्र, आता अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवत आहे. यामध्ये टेक कंपनी गुगलचा देखील समावेश आहे. गुगलने (Google) आपल्या वर्क फ्रॉम होम धोरणात मोठा बदल करत अधिक कडक नियम लागू केले आहेत. आता काही घरून काम करणाऱ्यांना (remote) कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास भाग पाडले जात आहे, अन्यथा नोकरी सोडावी लागण्याची वेळ येऊ शकते.

Artificial Intelligence (AI) वर भर देत असताना, कंपनीने खर्चात कपात करण्याचा आणि कामाची उत्पादकता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत गुगलच्या टेक्निकल सर्व्हिसेस आणि एचआर (People Operations) विभागातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत.

पूर्वी कायमस्वरूपी घरून काम करण्याची मुभा मिळालेल्या कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून किमान 3 दिवस कार्यालयात यावं लागणार आहे. जे कर्मचारी कार्यालयाच्या 100 किमीच्या आत राहतात, त्यांनी जून महिन्यापर्यंत या नवीन धोरणाचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गुगलच्या प्रवक्त्या कोर्टनी मेन्सिनी (Courtenay Mencini) यांनी स्पष्ट केलं की, “संवाद, नाविन्य आणि समस्यांचे निराकरण यासाठी प्रत्यक्ष भेटी आवश्यक आहेत. त्यामुळे काही टीम्सने कार्यालयाजवळ राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून काही दिवस ऑफिसमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.”

हा निर्णय कंपनीस्तरावर नाही, तर वेगवेगळ्या टीम्सनुसार ठरवला जात आहे. तरीही, गुगलमधील हे बदल टेक क्षेत्रातील मधील मोठ्या ट्रेंडचे संकेत देतात – कोरोनानंतर घरून काम करण्यावर दिलेले स्वातंत्र्य आता हळूहळू मागे घेतलं जात आहे.

सध्या गुगलमध्ये अंदाजे 1,83,000 कर्मचारी कार्यरत असून, ही संख्या दोन वर्षांपूर्वी 1,90,000 होती. गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन (Sergey Brin) यांनी नुकत्याच एका मेमोमध्ये सुचवलं की, AI टीममधील कर्मचाऱ्यांनी दररोज कार्यालयात यावं आणि आठवड्याला 60 तास काम करणं हे “उत्पादकतेसाठी चांगलं” आहे.

Share:

More Posts