सिंधूच्या क्रीडा अकादमीला मंजुरी

हैद्राबाद – भारताची स्तर बॅडमिंट खेळाडू पीव्ही सिंधू हिने विशाखापट्टणममध्ये क्रीडा अकादमी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेश सरकारने तिच्या या क्रीडा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. सिंधूच्या या क्रीडा अकादमीत बॅडमिंटसह इतरही खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आपल्या या क्रीडा अकादमीमुळे. दक्षिण भारतातील तरुण होतकरू खेळाडून चांगले मार्गदर्शन मिळेल तसेच या भागातून चांगले खेळाडू तयार होतील असे सिंधूने सांगितले. त्याच बरोबर आपल्या या क्रीडा अकादमीला मान्यता देवून सर्व प्रकारची मदत केल्या बद्दल तिने आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे आभार मानले आहेत.