India orders blocking of 119 apps : भारत सरकारकडून सातत्याने देशाच्या सुरक्षेला धोकादायक ठरू शकणाऱ्या अॅप्सवर सातत्याने बंदी घातली जात आहे. 2020 मध्ये सरकारकडून काही अनेक अॅप्सला भारतात बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सरकारने 119 अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
रिपोर्टनुसार, हे सर्व अॅप्स व्हीडिओ आणि वॉइस चॅटवर आधारित असून, तसेच, हे सर्व चीन आणि हाँगकाँगशी संबंधित आहेत. 2020 मध्ये सरकारने भारतात प्रचंड लोकप्रिय असलेल्या TikTok आणि ShareIt यांसारख्या चीनी अॅप्सवर बंदी घातली होती. जवळपास 100 पेक्षा अधिक चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.
सरकारने 2021 आणि 2022 मध्येही काही अॅप्सवर बंदी घातली होती. या अॅप्सवर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.
119 अॅप्सपैकी केवळ 3 अॅप्सची माहिती समोर आली आहे. बहुतांश अॅप्स अजूनही गूगल प्ले स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. व्हिडिओ चॅटिंग आणि गेमिंग अॅप ChillChat वर देखील बंदी घालण्यात आली आहे. ChangApp, HoneyCam या अॅप्सवर देखील बंदी घालण्यात आली आहे. हे अॅप्स सिंगापूर, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाशी संबंधित आहेत. मात्र, प्ले स्टोअरवर लाखो युजर्सनी हे अॅप डाउनलोड केले आहे.