नवी दिल्ली – श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टी -२० संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्या ऐवजी सूर्यकुमार यादव याची निवड करण्यात आली आहे. तर शुभमन गील उपकर्णधार असेल.वनडे ची धुरा रोहित शर्माच्याच खांद्यावर असेल. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणाही आज करण्यात आली. रिंकूसिंग,सॅमसन,शिवम दुबे संघात कायम असतील. हर्षित राणालाही संधी देण्यात आली आहे. भारतीय संघ या दौर्यात ३ टी-२० व ३ एकदिवशीय सामने खेळणार आहे.
