पर्थ – भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या गावस्कर – बॉर्डर चषकातील पहिल्याच कसोटी सामन्यात, भारताने ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी मोठा विजय मिळवत या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताने पुन्हा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात फक्त १५० धावा केल्या. मात्र दुसऱ्या डावात कोहली , जैस्वाल यांच्या शतकांच्या जोरावर ४८७ धावा करून ऑस्ट्रेलियायावर मोठी आघाडी मिळवली होती.भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिला डावात १०४ , तर दुसऱ्या डावात २३८ धावांवर गुंडाळले. चौथ्या दिवशीच भारताने २९५ धावांनी विजय मिळवला. या सामन्याच्या पहिल्या डावात ५. तर दुसऱ्या डावात ३ असे ८ बळी घेणारा कर्णधार बुमराह सामनावीर ठरला.
