‘टेस्ला’कडून मुंबई-दिल्लीपाठोपाठ आता पुण्यातही नोकरभरती सुरू, कंपनी लवकरच भारतात करणार एन्ट्री

Tesla Jobs: इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात व्यापार सुरू करण्याची शक्यता आहे. कंपनीकडून भारतात नोकर भरती सुरू करण्यात आली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच मुंबई आणि दिल्लीतील 13 जागा भरण्यासाठी लिंक्डइनवर जाहिरात दिली होती. आता कंपनीकडून पुण्यातही नोकरभरती केली जात आहे.

Tesla ने पुण्यात इलेक्ट्रॉनिक सिस्टम्समध्ये विशेषज्ञ असलेल्या PCB डिझाइन इंजिनियर पदासाठीच्या भरतीची घोषणा केली आहे. कंपनीकडून भारतातील कर्मचाऱ्यांमध्ये वाढ केली जात आहे. यापूर्वी, कंपनीने मुंबई आणि दिल्ली येथे 13 पदांसाठी नोकरभरती जाहीर केली होती.

Tesla ने LinkedIn वर अनेक नोकरीच्या संधी जाहीर केल्या आहेत, ज्यामुळे भारतीय बाजारातील त्यांची उपस्थिती वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. टेस्लाकडून पुण्याजवळील चाकण आणि चिखली या ठिकाणी कार उत्पादन निर्मिती प्लांट उभारला जाण्याचीही शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. त्यानंतर आता कंपनी भारतात आपले रिटेल ऑपरेशन्स सुरू करण्याची शक्यता आहे.

याआधी कंपनीने मुंबई व दिल्लीसाठी 13 जागांची पदांची भरती जाहीर केली होती. यामध्ये कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर, डिलिव्हरी ऑपरेशन्स स्पेशालिस्ट, इनसाइड सेल्स अॅडव्हायझर, कस्टमर सपोर्ट सुपरवायझर, कस्टमर सपोर्ट स्पेशालिस्ट, सर्व्हिस अॅडव्हायझर, ऑर्डर ऑपरेशन्स स्पेशालिस्ट, सर्व्हिस मॅनेजर, टेस्ला अॅडव्हायझर, पार्ट्स अॅडव्हायझर, बिझनेस ऑपरेशन्स अॅनालिस्ट, स्टोअर मॅनेजर आणि सर्व्हिस टेक्निशियन या पदांचा समावेश आहे.