Corona virus : 2020 साली चीनमधून प्रसारित झालेल्या कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. या व्हायरसची लागण झाल्याने लाखो लोकांना प्राण गमवावे लागले होते. तसेच, लॉकडाऊनलाही सामोरे जावे लागले होते.
आता चीनमधील शास्त्रज्ञांनी एक नवीन वटवाघळातील कोरोना व्हायरस शोधला आहे, ज्याला HKU5-CoV-2 असे नाव देण्यात आले आहे. या व्हायरसमध्ये माणसांना संक्रमित करण्याची क्षमता ठेवतो. SARS-CoV-2 (कोविड-19 निर्माण करणारा व्हायरस) प्रमाणेचा हा कारण तो माणसाच्या पेशींमध्ये प्रवेश करतो.
HKU5-CoV-2 नक्की काय आहे?
HKU5-CoV-2 हा व्हायरस चीनमधील वटवाघळांमध्ये आढळून आला आहे. हा मर्स (MERS) कोरोना व्हायरसच्या कुटुंबाशी संबंधित आहे, परंतु तो मानवांसाठी किती मोठा धोका ठरू शकतो, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या व्हायरसच्या प्राण्यांकडून मानवामध्ये संक्रमण होण्याच्या क्षमतेवर अधिक संशोधन करणे आवश्यक आहे.
या नवीन व्हायरसवरील अभ्यासाचे नेतृत्व प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट शी झेंगली यांनी केले आहे. शी यांना “बॅटवुमन” म्हणूनही ओळखले जाते, कारण त्यांनी वटवाघळांमध्ये आढळणाऱ्या कोरोना व्हायरसवर दीर्घकाळ संशोधन केले आहे. हा अभ्यास ग्वांगझोऊ लॅब, ग्वांगझोऊ अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, वुहान विद्यापीठ आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधील वैज्ञानिकांच्या सहकार्याने करण्यात आले.
शास्त्रज्ञांनी टेस्ट ट्यूब आणि मानवी पेशी मॉडेल्सवर चाचणी केली. यामध्ये आतडे आणि श्वसन संस्थेच्या पेशीमध्ये ACE2 प्रोटीनच्या जास्त प्रमाणात असल्यास व्हायरस पेशींना संक्रमित करू शकते. मात्र, आता या नवीन कोरोना विषाणूळे पुन्हा लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण होणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.