नवी दिल्ली- भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने समन्स बजावले . हे समन्स हैदराबादच्या उप्पल येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमसाठी डिझेल जनरेटर, अग्निशमन यंत्रणा आणि छत खरेदीसाठी वाटप करण्यात आलेल्या २० कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित आहे. एचसीएचे माजी अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे. मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर बजावण्यात आलेले हे पहिलेच समन्स असून, त्यांना ईडीने आजच हजर राहायला सांगितले होते. मात्र अझरूद्दीन हे ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नाही आणि त्यांनी आणखी वेळ मागिलता.
अझरुद्दीन यांची सप्टेंबर २०१९ मध्ये हैदराबाद क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. जून २०२१ मध्ये त्यांना आपले पद सोडावे लागले. निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. ईडीने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांविरुद्धही मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडीने तेलंगणातील ९ ठिकाणी छापे टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली होती अझरुद्दीन यांच्यावक त्यांच्या कार्यकाळात निधीचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप आहे.
भारताचा माजी कर्णधार अझरुद्दीनला ईडीचे समन्स
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/10/4ee5c17f-a039-4b94-ae8a-6fb797197541.png)