बंगळुरू- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर तिसऱ्यांदा हृदय शस्त्रक्रिया होणार आहे.२१ मार्च रोजी चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये माजी मुख्यमंत्र्यांची आणखी एक झडप बदलण्याची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सुरुवातीला चेन्नई आणि बंगळुरू येथील स्थानिक डॉक्टरांकडून ही शस्त्रक्रिया करण्यास ६४ वर्षीय जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी नकार दिल्यानंतर आता अमेरिकेतून खास तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ही शस्त्रक्रिया करणार आहे.
कुमारस्वामी १९ एप्रिल रोजी अपोलोमध्ये दाखल होतील. त्याच दिवशी अमेरिकेतील डॉक्टर रूग्णालयात पोहचून त्यांची प्राथमिक तपासणी करतील. २१ एप्रिल रोजी डॉक्टर मांडीच्या एका नसातून व्हॉल्व्ह इंजेक्शन देतील आणि हृदयात ढकलतील. नव्याने इंजेक्ट केलेली झडप आधीची झडप बाहेर ढकलून ती निष्क्रिय करेल.अशाप्रकारे ही शस्त्रक्रिया पार पडून चार दिवसांत म्हणजे २५ एप्रिल रोजी कुमारस्वामी यांना डिस्चार्ज दिला जाईल.