‘छत्रपती शिवाजी महाराज’ सिनेमाचे नवीन पोस्टर आले समोर, शिवरायांच्या भूमिकेत दिसणार ऋषभ शेट्टी

Rishab Shetty Movie: सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील ‘छावा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहेत. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यातच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. कांतारा चित्रपटातील अभिनेता ऋषभ शेट्टीच्या ‘द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंती निमित्ताने या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमध्ये शिवरायांच्या भूमिकेत ऋषभ शेट्टी भवानी मातेच्या समोर उभा आहे.

पोस्टरसोबतच चित्रपटाच्या रिलीज तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. ‘द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज’ हा चित्रपट 21 जानेवारी 2027 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदीसह कन्नड, तेलुगु, तमिळ, मराठी, मल्याळम आणि बंगाली भाषेत रिलीज होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन  संदीप सिंग हे करणार आहेत. या चित्रपटाचे नवीन पोस्टर पाहुन चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. मात्र, प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.