इब्राहिम अली खान करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, ‘या’ चित्रपटात झळकणार

Ibrahim Ali Khan : गेल्याकाही वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्सला संधी मिळाली आहे. बॉक्स ऑफिसवर या स्टार किड्सचे काही चित्रपट गाजले, तर काही चित्रपट फ्लॉप झाले. आता अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम बॉलिवूडमध्ये लवकरच एन्ट्री करणार आहे.

इब्राहिम अली खानच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने याची माहिती दिली होती. मात्र, इब्राहिम कोणत्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हे सांगितले नव्हते. मात्र, आता इब्राहिमच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर समोर आले असून, तो ‘नादानियां’ (Nadaaniyan Movie) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हे आहे.

विशेष म्हणजे अनेक स्टार किड्सचे बॉलिवूडमध्ये पदार्पण हे मोठ्या पडद्याच्या माध्यमातून झाले आहे. मात्र, इब्राहिमचा पहिला चित्रपट थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘नादानियां’ चित्रपटाबाबत ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (Netflix) घोषणा केली आहे.

‘नादानियां’मध्ये इब्राहिमसोबतच श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर देखील असणार आहे. ‘नादानियां’मध्ये हे दोन्ही स्टार किड्स रोमॅन्स करताना दिसतील. नेटफ्लिक्सने ‘नादानियां’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या चित्रपटात इब्राहिम आणि खुशीसोबत दिया मिर्झा, सुनील शेट्टी, जुगल हंसराज आणि महिमा चौधरी हे कलाकार देखील असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाउना गौतम यांनी केले आहे. या चित्रपटाची रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी लवकरच हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध होईल.