संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 29 January 2023

Cera Sanitaryware Ltd: आधुनिक सुविधा पुरवणारी कंपनी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सीईआरए सॅनिटरीवेअर लिमिटेड ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी कंपनी आहे. ग्राहकांच्या आधुनिक गरजा लक्षात घेऊन सीईआरएने विविध उत्पादने बनवली आहेत.

सॅनिटरीवेअर, नळांव्यतिरिक्त हाय एंड शॉवर, स्टीम क्यूबिकल्स आणि व्हर्लपूल्सचा समावेश असलेल्या विस्तृत उत्पादन पोर्टफोलिओने CERA ही सध्याच्या जीवनशैलीत आधुनिक आणि सुसज्ज उत्पादने शोधणाऱ्या ग्राहकांची प्राथमिक निवड बनवली आहे. CERA कडून सतत आधुनिक उत्पादने तयार केली जातात त्यामुळे या कंपनीची प्रचिती वाढली आहे. तसेच, यातील काही नवकल्पना उद्योगासाठी बेंचमार्क बनल्या आहेत.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन तयार केली जातात. या कंपनीची स्थापना 1980 मध्ये स्थापन झाली होती. तेव्हापासून ही कंपनी टिकाऊपणावर भर देऊन गुणवत्तेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करत आहे. या कंपनीकडून नैसर्गिक वायूंचा वापर केला जातो. सॅनिटरीवेअरची उत्पादन क्षमता 2.70 दशलक्ष 3.0 दशलक्ष तुकड्यांपर्यंत वाढली आहे. CERA ने वाढत्या मागण्या समाधानाने पूर्ण करताना उद्योगात आपला नेतृत्व दर्जा कायम ठेवण्याची योजना आखली आहे.

या कंपनीची उत्पादन क्षमता पाहता कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. ८ नोव्हेंबर २००७ साली या कंपनीच्या शेअरची किंमत ७३ रुपये होती. मात्र, गेल्या १५ वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना ४५२१ टक्के परतावा दिला आहे. सध्या (१६ मार्च २०२२ रोजी) या कंपनीच्या शेअरची किंमत ४ हजार ५९२ रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अस्थिरता होती. मात्र, या अस्थिर काळातही या कंपनीचे शेअर ग्रीन ट्रेडमध्ये बंद होत होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami