500 रुपयांच्या बजेटमध्ये येणारे सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन्स, जाणून घ्या फायदे

Palette Creation
+91 9930666001

———- Forwarded message ———
From: officialmarathiwriter <officialmarathiwriter@gmail.com>
Date: Mon, 20 Jan 2025 at 8:08 PM
Subject: Navakal Articles – 20/1/25
To: <palettec.ind@gmail.com>
Cc: Raamesh Gowri Raghavan <iambecomedeath@gmail.com>, <rohit@navakal.in>

1. 500 रुपयांच्या बजेटमध्ये येणारे सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन्स, जाणून घ्या फायदे

Best Mobile Recharge plans Under 500: टेलिकॉम कंपन्या जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्हीआयकडे (Vi) 500 रुपयांच्या बजेटमध्ये येणारे अनेक चांगले रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. कमी किंमतीत येणाऱ्या या रिचार्ज प्लॅन्समध्ये तुम्हाला कॉलिंग, इंटरनेट, मेसेजसह अनेक फायदे मिळतील. तिन्ही कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

जिओचे प्लॅन्स

  • 249 रुपयांचा प्लॅन – जिओच्या या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे, यामध्ये दररोज 1 जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात.
  • 299 रुपयांचा प्लॅन – जिओच्या 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता 28 दिवस असून, यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळेल.
  • 319 रुपयांचा प्लॅन – कंपनीच्या 319 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळेल. या प्लॅनची वैधता संपूर्ण एक महिना आहे.
  • 399 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2.5 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जातात.

एअरटेलचे प्लॅन्स

  • 299 रुपयांचा प्लॅन – एअरटेलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची वैधता 28 दिवस असून, यामध्ये कॉलिंगचीही सुविधा मिळेल.
  • 349 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. यामध्ये दररोज 1.5 जीबी डेटा, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल.
  • 355 रुपयांचा प्लॅन – 355 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी एकूण 25 जीबी डेटा,  अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 SMS चा फायदा मिळेल.
  • 379 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनची वैधता एक महिना आहे. यात दररोज 2 जीबी डेटा, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल.

व्हीआयचे प्लॅन्स

  • 209 रुपयांचा प्लॅन – व्हीआयच्या या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. यात 28 दिवसांसाठी एकूण 2 जीबी डेटा, 300 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल.
  • 299 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. यामध्ये यूजर्सला दररोज 1 जीबी डेटा, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल.
  • 365 रुपयांचा प्लॅन – व्हीआयच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची वैधता 28 दिवस असून, यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएस आणि रात्री अनलिमिटेड इंटरनेटचीही सुविधा दिली जाते.