या 10 बँका देत आहेत मुदत ठेवीवर 7 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज

Bank FD Interest: आजही शेअर्स, म्युच्युअल फंडऐवजी मुदत ठेवीमध्ये गुंतवणुकीला अनेकजण प्राधान्य देतात. मात्र, मुदत ठेवीवर मिळणारे व्याजदर खूपच कमी असते, अशी अनेकांची तक्रार असते. तुम्ही देखील कमी व्याजदरामुळे मुदत ठेव करण्याचे टाळत असाल तर काळजी करू नका. अशा अनेक बँका आहेत, जे गुंतवणूकदारांना 7.75 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. 

अनेकजण 1 वर्षांची मुदत ठेव करण्याला प्राधान्य देतात. तुम्ही देखील 1 वर्षाच्या मुदत ठेवीवर 7 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज मिळवू शकता. 

या 10 बँका देत आहेत एफडीवर 7 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज

बँक ऑफ इंडिया ग्राहकांना 1 वर्षाच्या एफडीवर 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना एफडीवर 6.80 टक्के ते 7.30 टक्के व्याज मिळेल. आरबीएल बँककडे एफडीवर सामान्य ग्राहकांसाठी 7 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के व्याज देते. याशिवाय, बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया सामान्य ग्राहकांना एफडीवर 6.75टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.25 टक्के व्याज देत आहे.

कर्नाटक बँकेच्या खातेधारकांना मुदत ठेवीवर 7 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.40 टक्के व्याज मिळते. डॉयचे बँक सामान्य आणि ज्येष्ठ नागरिक दोघांनाही 1वर्षाच्या एफडीवर 7 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज दिले जाते. 

डीसीबी बँक सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या एफडीवर 7.25 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे. तमिळनाड मर्कंटाइल बँक ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के तर, सामान्य ग्राहकांना 7.25 टक्के व्याज मिळते. कॅनरा बँकेच्या ग्राहकांना एफडीवर 7 ते 7.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. हे सर्व व्याजदर 1 वर्षांच्या मुदत ठेवीवर आहेत.