निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प किती तारखेला सादर करणार? जाणून घ्या

Union Budget 2025: वर्ष 2025 साठी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2025) लवकरच सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना अनेक आशा आहेत. अर्थसंकल्पात सरकारकडून कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. यंदा 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाईल. परंपरेनुसार दरवर्षी फेब्रुवारीच्या 1 तारखेला अर्थसंकल्प सादर केले जाते. केंद्रीय अर्थसंकल्पाची तारीख

यंदा 1 फेब्रुवारी 2025 ला निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या देशाचा अर्थसंकल्प मांडतील. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल निर्मला सीतारामन या आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार 3.0 चा हा दुसरा अर्थसंकल्प आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतानाचे भाषण कुठे पाहू शकता?

तुम्ही दूरदर्शन आणि संसद टीव्हीच्या माध्यमातून निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्प सादर करतानाचे भाषण पाहू शकता. याशिवाय, दूरदर्शन आणि संसद टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवरूनही हे भाषण पाहता येईल.

केंद्रीय अर्थसंकल्पाची कागदपत्रं कुठे पाहू शकता?

गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षीचा अर्थसंकल्प देखील पेपरलेस असेल. तुम्ही Union Budget Mobile App च्या माध्यमातून हिंदी व इंग्रजीमध्ये अर्थसंकल्पाविषयी जाणून घेऊ शकता. तसेच, www.indiabudget.gov.in वेबसाइटवर देखील संबंधित माहिती उपलब्ध असेल.